Ratnagiri News : जिल्ह्यातील 40,167 शेतकऱ्यांच्या खिशात महाविस्तार एआय ॲप

हवामान बदलासह शेतकऱ्यांच्या विविध समस्याबद्दल मिळणार नेमकी आणि अद्ययावत माहिती
Ratnagiri News
जिल्ह्यातील 40,167 शेतकऱ्यांच्या खिशात महाविस्तार एआय ॲप
Published on
Updated on

रत्नागिरी :जिल्ह्यासह राज्यभरात हवामान बदल, बाजारातील चढउतार आणि शेतीविषयक अचूक माहितीसाठी असणाऱ्या मर्यादामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती मिळावी म्हणून कृषी विभागाने महाविस्तार एआय ॲप विकसित केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत महाविस्तार एआय ॲपवर 40 हजार 167 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित एक डीजिटल सहायक ॲप शेती आणि आधुनिक डीजिटल सहायक ॲप आहे. पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यामधील दरी कमी करण्याच्या उद्देशाने हे विकसीत करण्यात आले आहे. या ॲपमधील चॅट बॉट वैशिष्ट्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत प्रश्न विचारता येणार आहेत. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे ॲप शेतकऱ्यांना रिअल टाइम हवामान अंदाज, बाजारभाव, कृषी तंत्रज्ञानाचा सल्ला तसेच विविध माहिती मिळणार आहेत. आधुनिक शेती पद्धतीचे मार्गदर्शन एका क्लिकवर उपलब्ध करून देते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news