Ratnagiri Fraud| राज्यमंत्री योगेश कदम यांच्या तोतया पी.ए.ला अटक

न्‍यायालयाकडून दोन दिवसांची पोलिस कोठडी; तपास सुरू
Arrest
ArrestPudhari
Published on: 
Updated on: 

खेड : चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील विद्याधर दत्ताराम साळुंखे (५६) या सामाजिक कार्यकर्त्याला राज्यमंत्री योगेश कदम यांचा तोतया पी. ए. बनून पाच हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या रविराज चिखले याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत केली.

चिपळूण तालुक्यात मोठ्या प्रमाणात चिरा दगडाच्या खाणी असून, या व्यावसायिकांकडून शासनाचा महसूल बुडवून शासनाची फसवणूक करत आहेत. या विरोधात महसूल राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्‍या निदर्शनास आणून देण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता त्यांचा स्वीय सहायक नसतानाही स्वीय सहायक असल्याचे भासवून रविराज चिखले याने पाच हजार रुपये घेतले होते. या फसवणूक प्रकरणी रविराज चिखले याच्याविरोधात खेड येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी याला अटक केल्यानंतर त्यास खेड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या फसवणूक गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विवेक अहिर यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येलवे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news