

रत्नागिरी : जिल्ह्यातील खासगी आस्थापनांनी महास्वयंम वेबपोर्टलच्या माध्यमातून रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या द़ृष्टिने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे श्रीमती यशोदा यशवंत पवार सभागृह, साखरतर रोड शिरगाव रत्नागिरी येथे करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांना/उद्योजकांनी आपणांकडे उपलब्ध असलेली रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करण्यात यावी व जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी/उद्योजकांनी आपणांस देण्यात आलेला युझर आयडी व पासवर्डचा वापर करून रिक्तपदे ऑनलाईन अधिसूचित करावी व जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार संघी उपलब्ध करून द्यावी. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.