Ratnagiri Fraud : वृद्धेची तब्बल साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असल्‍याची केली बतावणी
Cyber Crime
Cyber Crimepudhari photo
Published on: 
Updated on: 

रत्‍नागिरी : महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असून, गॅस कनेक्शनचे बिल ॲक्टिव्हेट करण्यासाठी रिचार्ज करावे लागेल, अशी बतावणी करत अज्ञाताने वृद्धेची तब्बल साडेपाच लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना बुधवार ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.४० ते शुक्रवार १३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वा. या कालावधीत कर्ला-कारेकरवाडी येथे घडली.

याबाबत जिक्रिया आदम फणसोपकर (७६, रा. कर्ला कारेकरवाडी, रत्‍नागिरी) यांनी शनिवार १४ नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यानुसार, ११ ते १३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अज्ञाताने फिर्यादी वृद्धेच्या मोबाईलवर फोन केला. आपण महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असून, तुमचे गॅस कनेक्शनचे बिल भरलेले आहे. तुम्हाला बिल ॲक्टिव्हेट करण्यासाठी १० रुपयांचा रिचार्ज मारावा लागेल, असे सांगून फिर्यादी वृद्धेच्या व्हॉटस्ॲ‍पवर महानगर गॅस नावाची ॲप्लिकेशन फाईल पाठवली.

फिर्यादी जिक्रिया फणसोपकर यांनी ती ॲप्लिकेशन फाईल ओपन केल्यानंतर त्‍यामध्ये त्यां‍नी त्‍यांचे पूर्ण नाव भरून त्‍या ॲप्लिकेशनवर असणारे सर्व कॉलम ओके करत पूर्ण भरले. त्‍यानंतर काही वेळाने फिर्यादीच्या कॅनरा बँकेच्या खात्‍यातून तब्बल ५ लाख ५६ हजार ६९१ रुपये ऑनलाईन काढण्यात आल्याचा त्‍यांना मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी वृद्ध महिलेने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४), माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६,(क),६६(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.