Ratnagiri News : गाणे-खडपोलीत वणव्यात होरपळून वृद्धेचा मृत्यू

वणव्याच्या तीव्रतेमुळे त्या होरपळून मृत्यूमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त
Ratnagiri News
गाणे-खडपोलीत वणव्यात होरपळून वृद्धेचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

चिपळूण : तालुक्यातील गाणे-खडपोली परिसरात वणव्यात होरपळून तारा तुकाराम वाघे (वय 70) या वृद्धेचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, तारा वाघे या 27 मार्चपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या शोधासाठी नातेवाईकांकडून प्रयत्न सुरू होते. दरम्यान, गाणे-खडपोली परिसरात लागलेल्या वणव्यानंतर जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तपासाअंती हा मृतदेह तारा वाघे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. वणव्याच्या तीव्रतेमुळे त्या होरपळून मृत्यूमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. मृतदेह शवविच्छेनासाठी शिरगाव प्रा. आ. केंद्रात पाठविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news