Ratnagiri News : वृद्धाच्‍या बँकेतील एफडी खात्‍यातून पावणेनऊ लाख काढून फसवणूक

रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्‍हा
digital fraud news
वृद्धाच्‍या बँकेतील एफडी खात्‍यातून पावणेनऊ लाख काढून फसवणूक(File Photo)
Published on
Updated on

रत्नागिरी : शहरातील टिळक आळी येथील वृद्धाच्या बँकेतील एफडी खात्‍यातून अज्ञाताने तब्बल पावणेनऊ लाख रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.२४ वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.

सुहास दिगंबर सोहनी (वय ६१, रा. सोहम अपार्टमेंट टिळक आळी, रत्‍नागिरी) यांनी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सुहास सोहनी यांनी क्रॅप्टो ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्ड तयार केले व तो ॲप अनइन्स्टॉल केला. त्‍यानंतर काही वेळाने अज्ञाताने फिर्यादी यांच्या बँकेतील एफडी खात्‍यावरून एकूण ८ लाख ६२ हजार ४०० रुपये बचत खात्‍यावर फिरवून ती रक्कम काढून घेतली. ही बाब सुहास सोहनी यांच्या लक्षात येताच त्‍यांनी रविवार, १७ ऑगस्ट रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news