वृद्ध कलावंत व साहित्यिकांनी मानधनासाठी आधार पडताळणी करावी

Ratnagiri News | वृद्ध कलावंत व साहित्यिकांनी मानधनासाठी आधार पडताळणी करावी
Elder Artists Aadhar Verification
वृद्ध कलावंत व साहित्यिकांनी मानधनासाठी आधार पडताळणी करावी File Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : राजर्षी शाहू वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन योजनेतील यापूर्वी मंजूर कलावंत/साहित्यिकांनी https://mahakalasanman.org/AadharVerification.aspx या लिंकवर जाऊन आपला आधार क्रमांक व त्याच्याशी संलग्न मोबाईल क्रमांकाबाबतची माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ८५२ मंजूर कलावंतांपैकी ६४८ कलाकारांचे आधार पडताळणी झाली असून अद्याप २०४ कलावंतांनी आधार पडताळणी केली नाही. ज्या कलावंतांनी आधार व मोवाईल क्रमांक पोर्टलवर अद्ययावत केलेले नाहीत त्यांचे मानधन १० डिसेंबर २०२४ पासून शासन स्तरावरून थांबविण्यात येणार आहे.

ज्या कलावंतांची पोर्टलवरील आधार पडताळणी प्रलंबित आहे त्यांनी स्वतःचे आधार कार्ड, वारस पति/पत्नीचे आधार कार्ड व बँक पासबूक यासह संबंधित पंचायत समिती कार्यालय, नगर परिषद कार्यालय तसेच महा ई सेवा केंद्रावर जाऊन वरील लिंक वापरून आधार पडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जि.प. यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news