Ratnagiri Drown News : रत्नागिरीतील कोळंबे-ओझर कोंड येथील डोहात दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्‍यू

कल्याण-मुंबई येथील मुले, क्रिकेट मॅचेस खेळण्यासाठी आली होती रत्‍नागिरीत
Drowning Death
Drowning DeathPudhari Photo
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : तालुक्यातील कोळंबे-ओझर कोंड येथील डोहात कल्याण-मुंबई येथील दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्‍यू झाला. ही घटना गुरुवार 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वा.सुमारास उघडकीस आली.

सौरभ पवनकुमार झा (16,रा.कल्याण,मुंबई) आणि शिवम रमेश यादव (16,रा.कल्याण,मुंबई) अशी डोहात बुडून मृत्‍यू झालेल्या अल्पवयीन मुलांची नावे आहेत. सौरभ आणि शिवम ह दोघेही मुंबईहून इतर शालेय विद्यार्थी व शिक्षकांसह क्रिकेटच्या मॅचेस खेळण्यासाठी 4 ऑक्टोबर रोजी रत्‍नागिरीला आले होते.

4 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत त्‍यांच्या कोळंबे येथील मैदानावर क्रिकेटच्या मॅचेस खेळवल्या गेल्या होत्‍या. गुरुवार 8 ऑक्टोबर रोजी सकाळी त्‍यांची मॅच झाल्यानंतर दुपारी सौरभ आणि शिवम हे दोघे इतर विद्यार्थ्यांसह फिरण्यासाठी बाहेर पडले होते.

ते कोळंबे ओझरकोंड येथे आले असता तेथील पाण्याच्या डोहात खेळण्यासाठी उतरले. त्‍याठिकाणी खेळत असताना त्‍यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात गटांगळ्या खाउन बुडू लागले. ही बाब त्‍यांचे शिक्षक साहिल खोचरेकर यांच्या लक्षात येताच त्‍यांनी आरडा-ओरडा केला असता स्थानिक ग्रामस्थांनी त्‍या ठिकाणी धाव घेत दोघांनाही पाण्याबाहेर काढले. त्‍यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्‍यांना तपासून मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news