Ratnagiri News| विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा दिलासा!

दहावी-बारावी विद्यार्थ्यांचे फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेचे शुल्क माफ; रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर या तीन तालुक्यांना दुष्काळाची सवलत लागू
Exam
ExamPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर हे तीन तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतर दुष्काळाच्या आर्थिक झळा सोसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शासनाने दिलासा दिला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे अर्ज शुल्क न घेता भरून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे.

शुल्कमाफीची घोषणा झाली, मात्र रक्कम किती? या निर्णयातील महत्त्वाची बाब म्हणजे शासनाने ‘परीक्षा शुल्क माफ’ करण्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील तीन तालुक्यांसाठी स्वतंत्रपणे किती कोटी रुपये किंवा किती लाख रुपयांची शुल्कमाफी होईल, असा स्वतंत्र आर्थिक आकडा अद्याप जाहीर झालेला दिसत नाही. राज्य मंडळाने सध्या ‘पुढील आदेशापर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्रे भरून घ्यावीत, असे निर्देश दिले आहेत.

दुष्काळी कुटुंबांवरील शैक्षणिक भार हलका

दुष्काळामुळे शेतीचे उत्पन्न घटले असताना कुटुंबांसमोर मुलांचे शिक्षण, पुस्तके, प्रवास, परीक्षा तयारी यांसारखे खर्च कायम असतात. अशा परिस्थितीत दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेचे शुल्कही पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार ठरू शकते. शुल्कमाफीमुळे हा खर्च कमी होऊन विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यात आर्थिक अडथळा राहणार नाही. विशेषतः, आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news