रत्नागिरी : अवैध मासेमारीवर ड्रोनची नजर

Drone Surveillance: अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा
Drone Surveillance on Illegal Fishing
रत्नागिरी : भाट्ये बीच येथील ड्रोन उड्डाण शुभारंभप्रसंगी उपस्थित अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, सहायक मत्सव्यवसाय आयुक्त आनंद पालव व अन्य.pudhari photo
Published on
Updated on

रत्नागिरी : राज्याच्या समुद्र क्षेत्रात घुसखोरी करुन मासेमारी करणार्‍या परप्रांतीय मच्छिमार नौकांसह इतर अवैध मासेमारीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. राज्यातील 7 जिल्ह्यामधील 9 ठिकाणी ड्रोन उड्डानाचा प्रारंभ गुरुवारी झाला. रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी ड्रोन उड्डाणासाठी हिरवा झेंडा दाखविला. मिरकरवाडा आणि साखरीनाटे समुद्रातील मासेमारीवर लक्ष ठेवण्यासाठी दोन ड्रोन उपलब्ध झाले आहेत. या ड्रोनच्या उड्डाणाचा भाट्ये बीच येथे प्रारंभ झाला.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मासळीच्या प्रजाती वाचविणे अत्यावश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर अवैध मासेमारीसह परप्रांतीय नौकांच्या घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेर्‍याचा उपयोग केला जाणार आहे. 9 ठिकाणच्या किनार्‍यांवर ड्रोनच्या उड्डानाचा कार्यक्रम मत्स व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसायातील कार्यालयातील नियंत्रण कक्षातून पाहिला.

मत्स व्यवसाय आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा प्रारंभ मत्स व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ड्रोन उड्डाणाच्या प्रारंभापूर्वी झाला. रत्नागिरीतील भाट्ये बिच येथे झालेल्या ड्रोन उड्डाण कार्यक्रमाला सहाय्यक मत्सव्यवसाय मंत्री आनंद पालव यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुतेसह सहाय्यक मत्सव्यवसाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

30 नॉटीकल मैल अंतरापर्यंत छायाचित्रे घेणे शक्य

हा ड्रोन समुद्र किनार्‍यालगत सरळ कितीही अंतरावर आणि समुद्राच्या आत 30 नॉटीकल मैल अंतरापर्यंत जाऊन समुद्रातील मासेमारी नौकांची छायाचित्रे घेऊ शकणार आहे. सहाय्यक आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षात ही छायाचित्रे पाहून आवश्यकतेनुसार कारवाईची पावले उचलली जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news