

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर आता पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतलेली आहे. मात्र वातावरणातील बदलांमुळे सध्या साथीचे आजार वाढू लागले आहेत. त्यामुळे रत्नागिरी बाजारात व किरकोळ दराने ड्रॅगन फळ विक्रीस दाखल झाले असून ड्रॅगनफ्रूटला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. आवक ही वाढली असून किमतीत ही वाढ झाली असून 100 रुपये किलोदराने ड्रॅगनफ्रूट विक्री होत आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरात वातावरणात बदल झाले असून साथीच्या आजाराने तापजन्य आजाराने पुन्हा डोकेवर काढण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शहरातील खासगी, सरकारी दवाखाने हाऊसफूल्ल होत आहेत. दरम्यान, अशा तापजन्य आजारात पौष्टीक फळांची मोठी मागणी वाढली आहे. ड्रॅगन, किवी, सफरचंद फळास मागणी वाढली आहे. विशेषकरून ड्रॅगनफ्रूट भाव खात आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा येथून ड्रॅगन फळची आवक होत आहे. बाजारसमितीत ड्रॅगनची आवक वाढली असून दर ही चांगला मिळत आहे. शहरासह तालुक्यातील विविध बाजारपेठ, किरकोळ व्यापारी विक्रेते ड्रॅगन फळ विक्री करीत आहेत. सध्या लाल रंगाचे ड्रॅगनफळ विक्रीस आले आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळ चांगले असल्यामुळे ग्राहकांचे ड्रॅगनफ्रूट खरेदीसाठी कल वाढला असल्याचा स्थानिक व्यापार्यांनी सांगितले.