Ratnagiri DCC Bank : रत्‍नागिरी जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेची अंतिम मतदारयादी जाहीर

जिल्‍ह्यात १,२०३ मतदार करणार बँकेसाठी डिसेंबरमध्‍ये मतदान
Ratnagiri DCC Bank
Ratnagiri DCC Bank(Pudhari File Photo)
Published on: 
Updated on: 

रत्‍नागिरी : जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुकीचे रणशिंग ऐन दीपावलीत फुंकले जाण्‍याची शक्‍यता असून, मध्‍यवर्ती बँकेच्‍या निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी जाहीर झाली आहे. जिल्‍ह्यात विविध संस्‍था, वैयक्‍तिक असे १,२०३ एकूण मतदार आहेत. रत्‍नागिरी जिल्‍हा सहकारी मध्‍यवर्ती बँकेच्‍या संचालक मंडळाचा कार्यकाळ डिसेंबरमध्‍ये संपत आहे. त्‍यामुळे सहकार विभागाकडून निवडणुकीपूर्वीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

यापूर्वी जिल्‍हा बँकेत २१ संचालक होते. आता ४ संचालकांची वाढ झाल्‍याने २५ संचालकांसाठी मतदान होणार आहे. यात तालुकास्‍तरावर ९ संचालकांचा समावेश आहे. एकूण १,२०३ मतदारांमध्‍ये प्राथमिक कृषी पतपुरवठा व वि. का. सेवा सहकारी संस्‍था तसेच धान्‍य अधिकोष सहकार संस्‍था यांचे सर्वाधिक ३३७ मतदार जिल्‍ह्यात आहेत.

दुग्‍ध संस्‍था, पशुपैदास संस्‍था, वराहपालन संस्‍था, पाणीपुरवठा संस्‍थांचे ४८, कुक्‍कुटपालन व शेळी-मेंढीपालन संस्‍थांचे १८, कृषी पणन, शेतीमाल प्रक्रिया संस्‍थांचे ८०, सर्वसाधारण-ट्रस्‍ट, मंडळ व व्‍यक्‍ती १२६, नागरी सहकारी पतसंस्‍था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्‍था व नागरी सहकारी बँकांचे १३६, गृहनिर्माण, गृहतारण सहकारी संस्‍थांचे १३६, पगारदार नोकरांच्‍या संस्‍थांचे ५३, मजूर संस्‍थांचे ९४, स्‍वयंरोजगार, बेरोजगार व हमाल कामगार सहकारी संस्‍थांचे ४९, औद्योगिक वाहतूक व्‍यवसाय, देखरेख उत्‍पादक सहकारी संस्‍था ४०, मच्‍छीमार सहकारी संस्‍था व अन्‍य सहकारी संस्‍था ८६ असे १,२०३ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news