Bamboo Farming: रत्नागिरी जिल्ह्यात 977.38 हेक्टर क्षेत्रावर होणार बांबू लागवड

847 ग्रामपंचायतींत 4 हजार 235 हेक्टरचे उद्दिष्ट; मागील वर्षी 77.88 हेक्टरवर लागवड
Bamboo Farming
बांबू लागवड
Published on
Updated on

रत्नागिरी: जिल्ह्यात यंदाच्या वर्षी 2026-27 साठी 847 ग्रामपंचायतींतून 4 हजार 235 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 977.38 प्रत्यक्ष लाभार्थी हे.क्षे. बांबू लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. 1 हजार 837 इतकी लाभार्थींची संख्या आहे. दरम्यान, मागील वर्षी 77.88 बांबू लागवड झाली आहे.

पडीक जमीन, शेताचे बांध, माळरानावर दलदलीच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी म्हणून विविध विभागांनी मेहनत घेतली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार या योजनेंतर्गत 2025-26 वर्षासाठी रत्नागिरी जिल्ह्यात 77.88 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड झाली. त्यामध्ये सर्वाधिक बांबू लागवड राजापुरात झाली आहे. जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीच्या माध्यमातून सक्षम व शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने बांबू लागवड सुरू आहे. बांबू इतर सर्व झाडांपेक्षा जास्त प्रमाणात कार्बन शोषते आणि ऑक्सिजन देते. त्यामुळे बांबू हा ग्लोबल वॉथर्मगवर एक उत्तम उपाय ठरू शकतो. त्यामुळे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने 2026-27 साठी 977.38 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे नियोजन केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 2026-27 साठी 977.38 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 हजार 837 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मागील वर्षी 77.88 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड झाली होती.
-अभिजित गडदे, जिल्हा विकास कृषी अधिकारी, रत्नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news