Ratnagiri : पाऊस थांबला; साथीच्या आजारांचा जोर

शासकीय, खासगी दवाखान्यात गर्दी; लहान मुलांना ताप, सर्दी, खोकल्याची साथ
Ratnagiri News
पाऊस थांबला; साथीच्या आजारांचा जोरPudhari
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार महिन्यांत पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. पाऊस थांबला मात्र, वातावरणात सततचा बदल होत असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ताप, अंगदुखी, सर्दी, खोकलासह साथीच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. दुसरीकडे लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याची साथ वाढली आहे. खासगी दवाखान्यात लहान मुलांची मोठी गर्दी दिसून येत आहे. साथीच्या आजारामुळे सिव्हील हॉस्पीटलसह, शासकीय, खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी दिसून येत आहे. सकाळ, संध्याकाळी रूग्णांची गर्दीने ओपीडी हाऊसफूल्ल होत आहे.

जिल्ह्यात दमदार पाऊस पडला मे महिन्याच्या अखेर पासून पावसाने सुरूवात केली होती. दरम्यान, आता सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाला आहे. विश्रांती घेतली आहे. दिवसभर कडक उन्ह तर संध्याकाळी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतात. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. नागरिक वैतागले आहेत.

हवामान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. साथीचे आजार पुन्हा डोके वर काढत आहे. ताप, थंडी, अंगदुखी, खोकला, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासह विविध आजाराचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे सिव्हील हॉस्पिटलसह खासगी दवाखान्यात रूग्णांची मोठी गर्दी होत आहे. ओपीडी हाऊसफूल्ल होत आहेत. काही दवाखान्यात रांगा लावत आहेत. जिल्ह्यात सतत वातावरण बदल होत असल्यामुळे रत्नागिरीकरांनी काळजी घ्यावी, लक्षणे आढळल्यास तातडीने दवाखान्यात दाखवावे असेही आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात वातावरण बदलामुळे साथीच्या आजारात वाढ होत आहे. ताप, थंडी, खोकल्याचे रूग्ण वाढत आहेत. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे रूग्ण जास्त नाहीत. लक्षणे आढळल्यास रूग्ण उपचार घेऊन बरे होतात.
विकास कुमरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news