Ratnagiri News : देवरुख शहरात मुख्यजलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया

देवळे फाटा परिसरातील प्रकार
Devrukh Water Pipeline
Devrukh Water Pipeline
Published on
Updated on

देवरुख : शहरातील देवळे फाटा परिसरामध्ये देवरुख साखरपा मुख्य रस्त्यावर नगरपंचायतीची मुख्य जलवाहिनी फुटली. मंगळवारी सकाळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. या वाहिनीला प्रेशर असल्यामुळे सहा फुटाचा कारंजाच उडत होता.

पाणी योजनेतील परशुराम वाडी धरणाकडून सोळजाई परिसराकडे जलवाहिनी देण्यात आली आहे. ही वाहिनी देवरुख साखरपा मुख्य रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आलेली आहे. यातील एक पाईपलाईन मंगळवारी सकाळी पाण्याच्या उच्च दाबाने फुटली. ही वेळ सोळजाई परिसराकडे पाणी देण्याची होती. पाणी प्रवाह चालू असतानाच जलवाहिनी फुटल्यामुळे सुमारे सहा फुटाचे पाण्याचे फवारे उडत होते. ही स्थिती सुमारे एक तास सुरू होती. या वेळेत हजारो लिटर पाणी वाया गेले. एक तर उन्हाळा प्रचंड असल्यामुळे पाण्याची कमतरता आहे. यातच हे पाणी वाया गेल्याबद्दल नागरिकांमधून बोल उठत होते.

देवरुख नळ पाणी योजनेच्या मुख्य जलवाहिन्या कमकुवत झाल्या आहेत. यामुळे वारंवार या वाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत असतात. नगरपंचायतीच्या निदर्शनात येताच त्यांची दुरुस्ती केली जाते. मात्र या जलवाहिन्या कायमस्वरूपी नवीन टाकण्यासाठी कोणतीही पावले उचलली नगरपंचायतीकडून नाहीत याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news