Ratnagiri- जिल्ह्यातील 'ब्लॅक स्पॉट' ठरताहेत जीवघेणे

३१ मेपूर्वी महामार्ग शंभर टक्के पूर्ण होत नाही; केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांची घोषणा हवेत विरणार
Ratnagiri Highway Black Spots
Ratnagiri Highway Black Spots
Published on
Updated on

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण अंतिम टप्प्यात आले असले तरी यावर्षी ३१ मेपूर्वी हा महामार्ग शंभर टक्के पूर्ण होऊ शकत नाही ही काळ्या दगडावरील रेघ आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सिंधुदुर्गमध्ये महामार्ग मेअखेर पूर्ण होण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात ती हवेत विरणार आहे. या महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यात अनेवा ब्लॅक स्पॉट अर्थात अपघात प्रवणक्षेत्र कायम आहेत. त्याठिकाणी अपघात होत असून, अनेकांचे बळी जात आहेत.

याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. मुंबई-गोवा महामार्ग ही कोकणवासीयांची जीवनवाहिनी आहे. या महामार्गावर सर्वात जास्त १४० कि.मी. लांबीचा रस्ता रत्नागिरी जिल्ह्यातून जातो, तर रायगडमधून ८५ कि.मी., सिधुदुर्गमध्ये १२० कि.मी. आहे. त्यामुळे रत्नागिरीत महामार्गाचे चौपदरीकरण सातत्याने कळीचा मुद्दा

ठरला आहे. तब्बल १७ वर्षे झाली तरी चौपदरीकरण पूर्ण होण्यासाठी कोकणवासीयांना प्रतीक्षा कराबी लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. रानागिरी व रायगडमधील अंतिम टप्प्यात आहे. एकीकड़े चौपदरीकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, असे सांगितले जात असताना आता टोलवसुलीसाठी तयारी केली जात आहे. मात्र जिल्ह्यातील महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रे ठलीच आहेत. त्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण करताना अभियांत्रिकीचा कौशल्याने बागर केल्याचे आढळून येत नाही. अनेक ठिकाणी आधीच्या रस्त्यावरच रुंदीकरण करून चौपदरीकरण केले असल्याने पूर्वीचे अनेक ब्लॅक स्पॉट कायम राहिले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यात चौपदरीकरणाचा मार्ग खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या प्रमुख शहरातून जातो. हे क्षेत्र घाट, नद्या व चळणावळणाचे आहे. मात्र, सौपदरीकरण करताना यातील प्रमुख वळणे काढलेली नाहीत. भोस्ते घाटाचे वळण 'ब्लॅक स्पॉट' खेड तालुक्यातील भोस्ते घाटाचे चळण अतितीव्र उतार व चढ आणि धोकादायक वळण असल्याने ब्लॅक स्पॉट ठरले आहे. याठिकाणी अपघात घडत आहेत, मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग डोळेझाक करीत आहे. सातत्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर अपघात होत असून अनेक अवजड वाहने या वळणावरील कठड्याला आदळत आहेत. त्यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे.

Ratnagiri Highway Black Spots
Ratnagiri - आंबा-काजू नुकसान सर्वेक्षणाला सुरुवात

मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्याठिकाणी केवळ गतिरोधक घालून आपली जबाबदारी झटकली आहे. यामुळे भोस्ते घाट अपघाती ठरत आहे. याबरोबरच खेड येथील जगबुडी पूल व भरणे नाका या ठिकाणीही अपपात महून असून हा भाग संवेदनशिल ठरला आहे. परशुराम घाट 'ब्लॅक स्पॉट' चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट हादेखील अपघातप्रवण क्षेत्र बनला असून प्रत्येकवेळी या ठिकाणी छोटे-मोठे अपघात पडत आहेत. परशुराम घाटाला पर्याय म्हणून बोगदा झाला असता तर हा घाट अधिक सुरक्षित झाला असता. मात्र राष्ट्रीय महामार्गन याठिकाणी अभियांत्रिकी कौशल्याचा अभाव दर्शविला आहे. शास्त्री पूल 'ब्लॅक स्पॉट' तिसरा महत्वाचा टप्पा म्हणजे, संगमेश्वर-त्नागिरी भागात संगमेश्वर येथील शास्त्री पूल ते बाजारपेठ दरम्यानचा भाग अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे. त्या ठिकाणी असलेले पूर्वापार वळण कायम ठेवल्याने अपघाताला आमंत्रण देण्यात आले आहे.

बास्तविक, या ठिकाणी रस्ता रसळ करून हे वळण काढण्यासाठी मार्ग होता. मात्र, राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी किंवा ए. सी. मध्ये बसून तयार केलेल्या आराखड्यामुळे हे वळण कायम राहिले आहे व अपघातप्रवण बनले आहे. त्याच पद्धतीने निवळी घाट व हातखंबा परिसर हा देखील अपघातप्रवण आहे. लांजा-राजापूर शहराच्या वळणावर देखील काही ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्रे आहेत. पूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर ४० हुन अधिक ब्लॅक स्पॉट होते.

Ratnagiri Highway Black Spots
Minor Girl Assault- शालेय मुलीवर जंगलात अत्याचार; आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

त्यामध्ये सर्वाधिक ब्लैक स्पॉट रायगड जिल्ह्यात होते. मात्र, आता चौपदरीकरण अंतीम टप्प्यात आल्याने अनेक ब्लॅक स्पॉट संपले आहेत, चौपदरीकरण करताना काही बळणे काढण्यात आली असून अनेक ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरब्रिज झाले आहेत. त्यामुळे अपघातप्रवण स्थळांची संख्या कमी झाली आहे. मात, खेड, चिपळूण व संगमेश्वर येथील ब्लॅक स्पॉट कायम आहेत. चौपदरीकरण करताना हे ब्लॅक स्पॉट काढण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र, पूर्वीच्या रस्त्यावरच चौपदरीकरण केल्याने धोकादायक वळणे कायम राहिली आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभाग हो वळणे काढण्यासाठी काही उपाययोजना करणार का? असा सवाल क्लिह्यातून उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news