Ratnagiri News : ढाक्‍कू माकूम..च्‍या तालावर बालगोपाळांनी धरला ताल

राजकीय पक्षांच्‍या दहीहंड्या ठरल्‍या लक्षवेधी; रात्री उशिरापर्यंत दहीहंडी फोडण्‍यासाठी गोविंदा पथकांमध्‍ये चढाओढ
Dahi Handi
Dahi Handi
Published on: 
Updated on: 

रत्‍नागिरी : ढाक्‍कू माकूम.. ढाक्‍कू माकूम.. गोविंदा रे गोपाळा यशोदेच्‍या तान्‍या बाळा.. च्‍या तालावर गोविंदा पथकांसह बालगोपाळांनी ताल धरला. रत्‍नागिरीतील ग्रामीण भागासह शहरातील नाक्‍यानाक्‍यावर दहीहंडी उभारण्‍यात आल्‍या होत्‍या. राजकीय पक्षांच्‍या लक्षवेधी दहीहंडी आकर्षणाचा विषय ठरल्‍या होत्‍या. रात्री उशिरापर्यत दहीहंडी फोडण्‍यासाठी गोविंदा पथकांमध्‍ये चढाओढ सुरु होती.

रत्‍नागिरी शहरातील विठ्ठल मंदिरामध्‍ये गोपाळकाल्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी छोट्या बालदोस्‍तांचे कार्यक्रमही पार पडले. यावेळी बालदोस्‍तांच्‍या स्‍ते दहीहंडी फोडून शहरातील गोपाळकाल्‍याला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. त्‍यानंतर विठ्ठल मंदिर परिसर, गोखले नाका, राधाकृष्‍ण नाका, राम आळी, मच्‍छीमार्केट परिसरातील दहिहंड्या स्‍थानिक बालगोपाळांनी फोडल्‍या.

शहरातील मारुती मंदिर येथे उबाठा शिवसेनेतर्फे एक लाखाच्‍या दहीहंडीचे आयोजन करण्‍यात आले. मशालीचे झेंडे सर्व परिसरात लावण्‍यात आल्‍याने मारुती मंदिर परिसर भगवामय झाला होता. क्रेनवरील हंडी आकर्षणाचे केंद्र बनली होती.

ज्‍येष्‍ठ शिवसेना पदाधिकारी प्रमोद शेरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली शहरातील पदाधिकार्‍यांनी यंदा प्रथमच मोठा उत्‍सव साजरा केला. भाजपातर्फेही यंदा प्रथमच राणी लक्ष्‍मीबाई चौकात दहीहंडी उत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले. यासाठी २५ हजार ५५५ रुपयांचे पारितोषिक होते. याठिकाणी सांस्‍कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्‍यात आले. शहरातील एसटी स्‍टँण्‍ड येथेही दहीहंडी आयोजित करण्‍यात आली. शहरातील रामनाका परिसरात शिवसेना उबाठाचे नगरसेवक केतन शेट्ये यांनी उभारलेली दहीहंडीही लक्षवेधी ठरली. यावेळी बाळ गोपाळाचा उत्साह ओसंडून वाहत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news