Ratnagiri Crime : ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

जयगड पोलिसांची कारवाई
Ratnagiri Crime News
ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या
Published on
Updated on

रत्नागिरी : जयगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील साखरी बौध्दवाडी येथील फिर्यादीच्या बँक खात्यातून 4 लाख 82 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन संशयितांच्या जिल्हा पोलिस दलाने मुंबईतून मुसक्या आवळल्या. फसवणूकीची ही घटना 17 फेब्रुवारी 2026 ते 9 मार्च 2026 या कालावधीत घडली होती.

दुर्गेश चम्मण रॉय (48, रा.दहिसर पूर्व, मुंबई) आणि अर्जुन रामसुंदर चौहान (38, रा. अजिंक्यनगर कोकणीपाडा दहिसर पूर्व, मुंबई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी तपास करताना पोलिसांनी संशयिताबाबत गोपनीय व तांत्रिक माहिती प्राप्त करण्याचे काम सुरू केले होते. 14 एप्रिल रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे पथकातील पोलिस निरीक्षक अभय तेली व पोलिस अंमलदार पोलिस हवालदार संदेश मोंडे,जयगड पोलिस ठाणे यांनी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण सीसीटिव्ही फुटेज आधारे या दोघांना अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news