Ratnagiri Crime : ‘दिल्ली पोलिस कमिशनर’ बनून एलआयसी एजंटला ९४ हजारांचा गंडा

देवरुख पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Cyber Crime
Cyber Crime ( File Photo)
Published on: 
Updated on: 

देवरुख : ‘आपण दिल्ली पोलिस कमिशनर असल्याचे’ भासवून अटकेची धमकी देत एका भामट्याने देवरुख परिसरातील एलआयसी एजंटची ९४ हजार ९०० रुपयांची फसवणूक केली. व्हिडीओ कॉलद्वारे ही फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित एलआयसी एजंटला एका व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला. आपण दिल्ली पोलिस कमिशनर असल्याचे सांगून, तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली असून अटक करण्यासाठी पोलिस येत असल्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. अटकेच्या भीतीने घाबरलेल्या एजंटने गुगल पे तसेच स्कॅनरद्वारे संबंधित व्यक्तीच्या खात्यावर ९४ हजार ९०० रुपये पाठवले. मात्र, त्यानंतरही पुन्हा पैशांची मागणी करण्यात आल्याने एजंटला संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने देवरुख पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news