

लांजा : तालुक्यातील शिपोशी येथील एका तरुणीला एका समाजाच्या तरुणाने फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करत शिपोशी पंचक्रोशीसह तालुक्यातील नागरिकांनी मंगळवारी दुपारी लांजा पोलिस ठाण्यावर धडक देत संबधितांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात म्हटले आहे की, शिपोशी येथील एका मुलीला एका समाजाच्या युवकाने फूस लावून पळवून नेले असून त्याने मुलीच्या विरोधात षडयंत्र रचले आहे. त्याने तिच्याशी प्रेमाचे नाटक करून, प्रलोभने दाखवून तिच्यावर दबाव आणला आहे. याप्रकरणी या युवकाला मदत करणाऱ्या लांजा येथील काही युवकांचीही चौकशी करून कारवाई करण्मयाची मागणी केली. यावेळी पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी कायदेशीर बाजू तपासून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुक्यातील विविध हिंदू संघटना पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.