Ratnagiri News : पेट्रोल पंप डिलरशिपचे आमिष; साडेसहा लाखांचा गंडा

रत्नागिरी ग्रामीणमधील सर्वात मोठी सायबर फसवणूक; बीपीसीएलचे प्रतिनिधी असल्याची बतावणी
cyber crime
Cyber ​​crimeFile Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दाखल झालेल्या सायबर फसवणुकीच्या १४ गुन्ह्यांमध्ये रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यातील ६ लाख ३३ हजार ५०० रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण सर्वाधिक गंभीर ठरले आहे. दिव्यांग पेट्रोल पंप डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली.

तक्रारदार मनोहर शंकर मेळगे यांनी दिव्यांग पेट्रोल पंप डिलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर 9831247987 आणि 9831248024 या मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधून आरोपींनी स्वतःला बीपीसीएलचे प्रतिनिधी असल्याची बतावणी केली. डिलरशिप मंजूर झाल्याचे सांगत नोंदणी, प्रक्रिया, एनओसी आणि इतर शुल्कांच्या नावाखाली वेळोवेळी विविध बँक खात्यांत एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे पैसे भरण्यास सांगितले.

एप्रिल २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत तक्रारदारांनी एकूण ६ लाख ३३ हजार ५०० रुपये विविध खात्यांत जमा केले. मात्र, डिलरशिपबाबत कोणतीही प्रक्रिया पुढे न झाल्याने त्यांनी बीपीसीएलशी संपर्क साधला असता, अशा प्रकारची कोणतीही अधिकृत प्रक्रिया नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याच दिवशी जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यांतही विविध बँक खात्यांचा वापर करून सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारून पुढे वर्ग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांचे स्वरूप अधिक व्यापक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित मोबाईल क्रमांक, बँक व्यवहारांची साखळी, लाभार्थी खाती आणि या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news