Ratnagiri Crime : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची कोयत्याने हत्या; पती अटकेत

मंडणगड-कोंडगाव येथील घटनेने परिसरात खळबळ
Ratnagiri Crime News
Ratnagiri Crime News
Published on
Updated on

मंडणगड : तालुक्यातील कोंडगाव येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ६) दुपारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. वैशाली मंगेश पवार (वय २२, रा. कोंडगाव) असे मृत विवाहितेचे नाव असून, मंगेश नीलेश पवार (२५, रा. कोंडगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत रामभाऊ सखाराम पवार (६५, रा. कोंडगाव) यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, संशयित मंगेश पवार याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. शनिवारी दुपारी १२ वाजता वैशाली पवार घरासमोरील चिंचेच्या झाडाखाली उभी असताना मंगेश याने तिच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या वैशालीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

तिन्‍ही चिमुकली मुले झाली पोरकी

वैशाली पवार हिचा खून मंगेश पवार याने केल्‍याने त्‍याला अटक करण्यात आली आहे. यामुळे त्‍यांची चिमुकली अनुक्रमे ५, ४ व २ वर्षांची मुले उघड्यावर पडली आहेत. यामध्‍ये दोन्‍ही मुली मोठ्या असून छोटा २ वर्षांचा मुलगा आहे. यामुळे ही तिन्‍ही मुले आई-बापाविना पोरकी झाली आहेत. यात त्‍यांचा काय दोष आहे की त्‍यांना या वयात अनाथ म्‍हणून जगावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news