

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी ते चिपळूणदरम्यान गस्त घालत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयावरून वाहनाची तपासणी करत मोबाईल टॉवरच्या बॅटर्या चोरणाऱ्या चार चोरट्यांना जेरबंद केले. हे चौघेही पालघर जिल्ह्यातील असून, त्यांच्याकडून वाहनासह मोबाईल टॉवरच्या ३ बॅटर्या असा ४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जयप्रकाश एकनाथ चिंदरकर (३२, रा. विरार पूर्व, जि. पालघर), नवनाथ भगवान उतेकर (३६, रा. विरार पूर्व, जि. पालघर), कोशिष प्रभाकर जाधव (२७, रा. विरार पूर्व, जि. पालघर), तर मंगेश मनोज गुरव (२०, नालासोपारा, जि. पालघर) अशी संशयितांची नावे आहेत. अधिक तपास सावर्डे पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस हेडकॉन्स्टेबल विजय आंबेकर, वैभव मोरे, गणेश सावंत, अतुल कांबळे यांनी केली.