Ratnagiri Accident : दुचाकीची ट्रॅक्टरला मागून धडक; एक जण गंभीर जखमी

गुहागरमधील पाटपन्हाळे बसस्टॉप परिसरातील घटना
Accident
Accident
Published on
Updated on

गुहागर शहर : तालुक्यातील पाटपन्हाळे बसस्टॉप परिसरात शुक्रवारी झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसस्टॉपजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या - दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.

या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातामुळे दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य करत जखमीला उपचारासाठी रवाना केले. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसले तरी वेगावर नियंत्रण नसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news