Ratnagiri Crime : बनावट सोन्याचे दागिने विकून साडेतीन लाखांची फसवणूक; एक अटकेत

संगमेश्वर पोलिसांची कारवाई
Ratnagiri Crime News
बनावट सोन्याचे दागिने विकून साडेतीन लाखांची फसवणूक
Published on
Updated on

देवरूख : बनावट दागिने खरे असल्याचे भासवून साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र कुमार मोहनलाल परमार (रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दोन लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

याबाबत दिलेश प्रकाश गुजर (रा. बेणी खुर्द-गुजरवाडी, ता. लांजा) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २० एप्रिल रोजी लांजा येथील ‘यंग लूक’ कपड्यांच्या दुकानात काम करत असताना जितेंद्र परमार व त्याचा साथीदार तेथे आले. त्यांनी आर्थिक अडचण व गावाकडील लग्नाचे कारण सांगत आपल्याकडे असलेले सोने विकायचे असल्याचे सांगितले. आरोपींनी जोंधळी मणी असलेले सोन्याचे दागिने दाखवत त्यातील काही मणी तपासणीसाठी दिले. त्यानंतर हे दागिने खरे सोने असल्याचा विश्वास संपादन करून साडेतीन लाख रुपयांत व्यवहार निश्चित केला. २८ एप्रिल रोजी संगमेश्वर एसटी स्थानक परिसरात दागिने सुपूर्द करत त्यांनी फिर्यादीची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी जितेंद्र कुमार मोहनलाल परमार याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news