Ratnagiri Crime : भाचीवर अत्याचार केल्याचा मावशीच्या जोडीदारावर आरोप

रत्नागिरी परिसरात तीव्र संताप
Crime news
भाचीवर अत्याचार केल्याचा मावशीच्या जोडीदारावर आरोपFile Photo
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : शहरात एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. मावशीसोबत 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने तिच्यासोबत राहणाऱ्या तिच्याच अल्पवयीन भाचीचा विश्वासघात करत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ​'तू काम करून थकली आ​हेस, थोडा वेळ विश्रांती घे​' असा बनाव रचून तरुणाने पीडित मुलीला एका ठिकाणी नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध हे कृत्य केले. या घटनेमुळे रत्नागिरी परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

तक्रारदार अल्पवयीन मुलगी डिसेंबर २०२५ पासून तिच्या मावशीकडे राहण्यासाठी आली होती. तिच्या मावशीचा जोडीदार, संशयित आरोपी राज मनोज घोरपडे हा गेल्या ५ वर्षांपासून तिच्या मावशीसोबत 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये एकत्र राहत होता. त्यामुळे त्यांच्यात कौटुंबिक ओळख होती. आरोपी हा मुलीला क्लाससाठी येण्या-जाण्यासाठी सोडत असे. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास आरोपीने ​'तू काम करून थकली आहेस, थोडा वेळ आराम कर' असे सांगून मुलीला​ एका लॉजमध्ये नेले. तिथे एका खोलीत त्याने अल्पवयीन मुली​वर अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबता, जर तू याबद्दल कोणाला काही सांगितलेस, तर मी तुझे रेकॉर्डिंग व्हायरल करीन, अशी थेट धमकी देऊन तिचे तोंड बंद ठेवण्याचा प्रयत्न केला.

या सर्व घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने धैर्याने पुढे येत पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पाेस्को​ कायद्यासह संबंधित गंभीर कलमांन्वये रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा​ दाखल करण्यात आला. हा गुन्हा ऑनलाईन पद्धतीने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याकडे प्राप्त झाल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार दाखल करून घेण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियांका देसाई करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news