

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात रविवारी (दि. 10 ऑगस्ट) रात्री साडेअकराच्या सुमारास कंटेनर (एम एच 43 सी के 4208) आणि कार (एम एच 08 ए एक्स9348) यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कंटेनरचा चालक शौनक (रा. राजस्थान) हा कंटेनरच्या पुढील चाकाखाली चिरडल्याने जागीच ठार झाला.
अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी हे आपली रुग्णवाहिका घेऊन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेन बोलावून मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यानंतर मृतदेह कळंबणी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या अपघाताचे कारण समजू शकले नसून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.