Ratnagiri Politics : काँग्रेसच्या नगरसेविका झारी यांचे पद कायम

जिल्हाधिकाऱ्यांनीही रद्द केला अपात्रतेचा आदेश
Rajapur Municipal Council
राजापूर नगर परिषद
Published on: 
Updated on: 

राजापूर : राजापूर नगर परिषदेतील काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज महंमद झारी यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरविण्याचा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने रद्द केला आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही झारी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा आदेश मागे घेतला आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद कायम राहिले असून, सभागृहातील बहुमताबाबत अडचणीत असलेल्या महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ ‘अ’ मधून अफरोज झारी निवडून आल्या होत्या. त्यांनी सादर केलेले इतर मागासवर्ग प्रवर्गातील न्हावी जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने १७ जुलै रोजी अवैध ठरविले होते. त्यांच्या विरोधातील उमेदवाराने घेतलेल्या हरकतीनंतर समितीने हा निर्णय दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news