Ratnagiri : बंधारा पाण्यात; प्राधिकरणकडून पाहणी कशाची?

काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारीनंतर वडगाव ग्रामस्थांचा सवाल
Ratnagiri News
बंधारा पाण्यात; प्राधिकरणकडून पाहणी कशाची?
Published on
Updated on

खेड : वडगाव बंधार्‍याचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांचे पथक बुधवारी पाहणीसाठी वडगाव येथे दाखल झाले. मात्र, मुसळधार पावसामुळे बंधारा संपूर्णपणे नदीपात्रात बुडालेला असताना, अशा स्थितीत नेमकी कोणती पाहणी करण्यात आली? असा सवाल ग्रामस्थ सचिन मोरे यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वडगाव धरणाच्या निकृष्ट कामाबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे येथील मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्या स्वाक्षरीने 30मे 2025 रोजी संबधित अधिकार्‍यांना तपासणी व चौकशी समिती गठित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार उपअभियंता यू. जे. फुलोरे व सहायक अधीक्षक अभियंता बी. डी. पवार यांच्यासह पथक वडगाव येथे दाखल झाले होते. बंधार्‍याचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार आम्ही वेळोवेळी केली होती. आजही बंधारा संपूर्ण पाण्याखाली असून देखील पाहणी झाल्याचे दाखवले जाते, तर नेमकी पाहणी कशी झाली? हा केवळ दिखाऊपणा आहे, असा सवाल तक्रारदार सचिन मोरे यांनी केला. दरम्यान, या प्रकरणात चौकशीस गती देऊन प्रत्यक्ष दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news