

रत्नागिरी : दिवाळी सण शुक्रवारपासून सुरूवात होत असून, कित्येकजण गावी जात असतात. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-जिल्हा रुग्णालयात केवळ 10 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. तसेच वारंवार प्लेटलेटची कमतरता जाणवत आहे. दररोज 30 हून अधिक रक्ताच्या पिशव्या लागतात, तर 8 हून अधिक प्लेटलेट लागत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत रक्ताची, प्लेटलेटची कमतरता भासणार असून, जास्तीत जास्त रक्तदात्यांनी स्वतःहून रक्तदान करावे. संघटना, संस्था, राजकीय पक्षांनी रक्तदानाचे शिबिर घेणे गरजेचे आहे. जेणेकरून रक्त संकलित होऊन रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात रत्नागिरीसह तालुक्यातील कित्येक रुग्ण उपचारासाठी येत असतात. यावेळी रक्ताची मोठी कमतरता भासत असते. उन्हाळी सुट्टी, सणासुदीत रक्ताची सर्वात जास्त कमतरता भासत असते. कारण शाळा, महाविद्यालये बंद असतात, नोकरदार, व्यापारी वर्ग आपल्या मूळ गावी जात असतो त्यामुळे रक्त वेळेत मिळत नाही. खासगी रक्तपेढ्याकडून रक्त संकलित केले जाते. काही वेळा रक्तपेढीत ही रक्तसंकलित नसते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागते. रक्त असूनसुध्दा काही वेळा रुग्णालयात नाही म्हणून सांगितले जाते अशा तक्रारी नातेवाईक, नागरिकांतून होत आहे. सिव्हील मध्ये दररोज 30 हुन अधिक रक्ताच्या पिशव्या लागत असतात. तसेच 8 हून अधिक प्लेटलेट लागतात. आता दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत. 10 दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा सिव्हीलमध्ये आहे. त्यामुळे काही दिवसांत रक्ताचासाठा लागणार आहे. खासगी ब्लडबँकेतून जादा पैसे देवून रक्त घ्यावे लागत आहे, असे आवाहन शासकीय मेडीकल कॉलेज-जिल्हा सिव्हील रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले.