

चिपळूण : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील तोंडली येथे निवडणूक भरारी पथकाला गस्त घालत असताना 68 हजार रुपयांची रक्कम सापडली आहे.
काही लोकांकडून ही रक्कम सावर्डे पोलिसांनी हस्तगत केली आहे. यामधील 18 हजार रुपये एका व्यक्तीच्या खिशामध्ये आढळून आले, तर त्याच भागामध्ये 50 हजार रुपयांची रक्कम भरारी पथकाला सापडली आहे. मात्र, हे 50 हजार कोणाचे, याचा तपास पोलिस करीत आहेत. अधिक तपास सावर्डे पोलिस करीत असून, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.