Ratnagiri News : ‘त्या’ बँक अधिकाऱ्याच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ कायम

काविळतळी परिसरासह नदीपात्रात पोलिसांकडून शोध सुरू
Missing Case
‘त्या’ बँक अधिकाऱ्याच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ कायम
Published on
Updated on

चिपळूण शहर : शहरातील उपनगर काविळतळी येथील एका बँकेच्या शाखाधिकाऱ्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ शोधण्यात पोलिस यंत्रणा वेगाने काम करीत असून, शनिवारच्या दिवशी दुचाकी आढळलेला परिसर पोलिसांनी पिंजून काढला. नजीक असलेल्या नदीपात्रात देखील यांत्रिकी नौकेच्या माध्यमातून तज्ज्ञांच्या पथकाने शोध मोहीम राबविली. मात्र, त्याचा पत्ता लागला नसल्याने बेपत्ता होण्यामागचे गूढ वाढले आहे.

अलोरे येथील पालांडे कुटुंबीयातील मुकुंद पालांडे हे शहरातील एका बँकेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. दरम्यान, मुकुंद पालांडे यांनी चार पानाच्या पत्राद्वारे शिरगाव पोलिस ठाण्यात आपली कैफियत मांडून बेपत्ता झाल्याची घटना घडली. त्यामुळे संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस यंत्रणेने तातडीने तपास हाती घेतला. पालांडे यांची दुचाकी नजीकच्याच कॅनॉल परिसरात आढळली. हा परिसरही पिंजून काढण्यात आला. दरम्यान, त्यांच्या शोधासाठी श्वान पथक मागविण्यात आले होते.

logo
Pudhari News
pudhari.news