

रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत जिल्ह्यासह राज्यभरातील एसटी बसस्थानकांचा दुसर्या टप्प्यातील पाहणी दौरा सुरू झाला आहे. दरम्यान, नुकतेच रत्नागिरी शहरातील जुने रहाटाघर बसस्थानक व नवीन एसटी बसस्थानाकांची पाहणी करण्यासाठी एसटी महामंडळाच्या कमिट्यांनी भेट दिली.
यावेळी प्रवाशांसाठी असणर्या सोयी-सुविधा, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, आरक्षण खिडकी, स्वच्छता यासह विविध बाबींची पाहणी करण्यात आली. रत्नागिरी बसस्थानकाची पाहणी करून कमिटी खूश झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ब, क, ड वर्गातील बसस्थानकांची पाहणी करण्यात आली आहे.
सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक आहे का हे पाहण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त वर्षभर राज्यभरातील एसटीच्या सर्व बसस्थानकावर स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात कमिटीने पाहणी करून गेल्यानंतर त्याचा निकाल जाहीर केला असून रत्नागिरीच्या नवीन बसस्थानकास अ मानांकन जाहीर झाले तर पाली ब, माखजन क मानांकन मिळाले आहे. दरम्यान, आता दुसर्या टप्प्यातील पाहणी करण्यासाठी कमिटी ही सकाळी 8.30 च्या सुमारास रत्नागिरी बसस्थानकाची पाहणी केली.
यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण समितीच्या अमृता ताम्हणकर, पुणे येथील वरिष्ठ सांख्यायिकी अधिकारी सागर गावडे या दोघांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. यावेळी जिल्हा आगार व्यवस्थापक संदीप पाटील, प्रद्युम्न शिरधनकर आदी उपस्थित होते. कमिटीने रत्नागिरी बसस्थानकात स्वच्छता आहे का, सेंटर पाँईट आहे का, कंट्रोल व्यवस्थापकाचे नंबर, ओआरएस सिस्टीम, मुक्कामी कर्मचार्यांची सोय, सीसीटीव्ही, उपहारगृह यास विविध सुविधांची पाहणी केली. येथील काही प्रवाशांची संवाद साधून समस्या आहेत का याची विचारणाही केली. यावेळी समाधानकारक उत्तरे मिळाल्यानंतर कमिटी खूश झाली.
महाराष्ट्र परिवहन मंडळातील कमिटीच्या सदस्यांनी विविध वर्गातील असलेल्या रत्नागिरी शहर, ग्रामीण भागातील बसस्थानकांची पाहणी केली आहे. यामध्ये रत्नागिरीतील रहाटाघर, नवीन बसस्थानक, चिपळूण, लांजा, राजापूर, पावस, खेड, दापोली, पाली, संगमेश्वर याही बसस्थानकाची पाहणी करण्यात आली आहे. पाहणी झाल्यानंतर लवकरच दुसर्या टप्प्यातील मूल्यांकन जाहीर करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकार्यांकडून सांगण्यात आले.