Bus Stand Library| रत्नागिरीकरांसाठी खुशखबर: बसस्थानकात मोफत वाचनालय सुरू; वाचकांच्या पसंतीच्या 'या' पुस्तकांचा आहे खजाना

बसला झाला उशीर, आता स्‍थानकातच वाचा पुस्‍तक; प्रवाशांचा वेळ लागतोय सत्‍कारणी
Bus Stand Library
Bus Stand Library
Published on
Updated on

रत्‍नागिरी : एसटी बसला आता उशिर झाला असेल तर करायचे काय असा प्रश्न प्रवाशांमध्ये असतो. त्‍यावर पर्याय म्‍हणून आता महाराष्ट्र राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या वतीने 75 बसस्‍थानकांवर मोफत पुस्‍तक वाचनालय सुरू करण्याचे आदेश दिले होते. अखेर रत्‍नागिरी बसस्‍थानकात नुकतेच मोफत पुस्‍तक वाचनालय सुरू करण्यात आले आहे. प्रवासी मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा पुस्‍तक, कथासंग्रह, स्‍पर्धा परीक्षेसाठीची पुस्‍तक वाचून आपला वेळ सत्‍कारणी लावत आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या वाढदिवसानिमित्त राज्‍याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्‍यातील ७५ बसस्‍थानकांत पुस्‍तक वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेवून घोषणा केली होती. प्रवाशांना एसटीची वाट पाहता पाहता मोफत पुस्‍तके वाचण्यास मिळणार असून आपला वेळ सत्‍कारणी लागणार आहे. मात्र, रत्‍नागिरी बसस्‍थानकात वाचनालय सुरू झाले नव्‍हते. अखेर विभाग नियंत्रक आश्वजीत जानराव यांनी बसस्‍थानकात वाचनालय सुरू केले आहे. मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा मोफत पुस्‍तक वाचनालय ठेवल्‍यमाळे वाचनप्रेमींना पर्वणीच मिळाली असून त्‍याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाचनालयामुळे प्रवाशांच्‍या ज्ञानात भर पडत असल्‍याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news