बुरंबाड येथील आमनायेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

Mahashivratri 2025 | Amanayeshwar temple | दुपारनंतर मंदिरात दर्शनासाठी रांग
Amanayeshwar temple
श्री आमनायेश्वर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. Pudhari Photo
Published on
Updated on

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील प्राचीन श्री आमनायेश्वर मंदिरात (Amanayeshwar temple) महाशिवरात्री निमित्त भाविकांनी आज (दि.२६) पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळच्या कालावधीत भाविकांची संख्या तुलनेने कमी असली तरी दुपार नंतर मंदिरात दर्शनासाठी रांग लागली होती. (Mahashivratri 2025)

हजारो वर्षे जुने असलेल्या या मंदिरात दिवसभरात हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतात. मंदिर परिसरात मोठी जत्रा भरते. लहान मुलांसाठी जत्रा हा मोठा कुतूहलाचा विषय असतो. महाशिवरात्री निमित्त श्री देव आमनायेश्वराचे पालखीतून थाटामाटात आगमन होते. त्रिपुर लावला जातो. मंदिर परिसरातील हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news