British Premier League| रत्नागिरीच्या अविराज गावडे याची इंग्लंडमधील मैदानात घोडदौड कायम

ब्रिटिश प्रीमियर लीगमध्येही पटकावला सामनावीर किताब
British Premier League
रत्नागिरीच्या अविराज गावडे याची इंग्लंडमधील मैदानात घोडदौड कायम
Published on
Updated on

रत्नागिरी : येथील युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे हा सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट कौंटी व प्रिमियर लीग खेळत असून, इंग्लंडमधील ब्रिटिश प्रिमियर लीगमध्ये खेळताना रविवारी झालेल्या सामन्यामध्ये 5 बळी मिळवत सामनावीर पुरस्कार पटकावला.

ब्रिटिश प्रीमियर लीग ही इंग्लंडमधील सर्वात मोठी प्रतिष्ठित क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये अनेक देशातील इंटरनॅशनल क्रिकेट खेळाडू सहभागी होत असतात. अविराजने वालवई ब्ल्यू या संघाकडून खेळताना मेटॉन बॉईज संघाविरुद्ध 8 षटकं टाकत फक्त 26 धावा देऊन 5 बॅटरना तंबूचा रस्ता दाखवला. यामध्ये त्याने 3.25 ची सरासरी राखली. अविराजने आपल्या गुगलीवर चार फलंदाजांना त्रिफळाचित करून एका फलंदाजाला लेग स्पीनवर बाद केले. इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या कौंटी क्रिकेट लिगमध्ये सुद्धा अविराजने याआधी तीन वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. बॅटिंग, बॉलिंग व फिल्डिंग अशा तिनही क्षेत्रात अविराज लक्षणीय कामगिरी करत आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे नाव इंग्लंडमध्ये सतत उज्ज्वल करत आहे. अनेक दिग्गज इंटरनॅशनल क्रिकेटर्सनी अविराजच्या गुगलीचे विशेष कौतूक केले आहे. इंग्लंडमधील खेळपट्ट्या या विशेषतः वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असतात, असे असूनही अविराजने आपल्या लेग स्पीन व गुगलीची विशेष छाप पाडली असल्यामुळे त्याचे विशेष कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news