Ratnagiri News : दाभोळ सागरी हद्दीत कथित वन्यजीव शिकारीचे प्रकार चर्चेत

शिकारीत जीव गेल्यानंतरही प्रश्न कायम, यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
Ratnagiri News
दाभोळ सागरी हद्दीत कथित वन्यजीव शिकारीचे प्रकार चर्चेत
Published on: 
Updated on: 

दापोली : दाभोळ सागरी पोलिस हद्दीतील वणौशी-खोंडारण परिसरात शिकारीसाठी गेलेल्या व्यक्तींना बंदुकीच्या गोळीचा अपघाती फटका बसून एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाल्याच्या घटनेनंतर या परिसरातील कथित बेकायदेशीर शिकारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका शिकारीच्या घटनेत थेट मानवी जीव गेल्यानंतरही या भागात वन्यप्राण्यांची शिकार नेमकी किती दिवसांपासून सुरू आहे आणि त्यावर संबंधित यंत्रणांचे किती प्रभावी नियंत्रण आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

दाभोळ सागरी हद्दीतील काही भागात रात्रीच्या वेळी शिकारीसाठी जाण्याचे प्रकार होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. जंगल, डोंगराळ, दुर्गम परिसराचा फायदा घेत वन्यप्राण्यांची कथित शिकार केली जात असल्याचे . मात्र, हे प्रकार केवळ चर्चेपुरते आहेत की त्यामागे प्रत्यक्षात मोठे शिकारीचे सत्र सुरू आहे, याचा तपास होणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे, शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुका, शिकारीची साधने आणि वन्यप्राण्यांची शिकार याबाबत नियम आहेत. तरीही शिकारीच्या प्रयत्नात एखाद्याचा जीव जाण्याची वेळ येत असेल तर यामागील संपूर्ण परिस्थिती तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. मानवी जीविताला धोका निर्माण होईपर्यंत कथित शिकारीचे प्रकार सुरू राहिले असतील, तर संबंधित यंत्रणांना याची पूर्वकल्पना होती का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. या घटनेनंतर केवळ अपघाती गोळीबाराचा तपास न करता परिसरातील कथित शिकारीचे नेटवर्क, शिकारीसाठी वापरली जाणारी शस्त्रे, वन्यजीवांची शिकार, सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती यंत्रणांनी तपासावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत का, याचाही मागोवा घेण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news