Ratnagiri News : कृषी विभाग करणार 650 मेट्रिक टन खतसाठा

खरीप हंगामासाठी येणार 2600 मेट्रिक टन युरिया; सर्वाधिक खतांचा साठा चिपळुणात होणार
Ratnagiri News
कृषी विभाग करणार 650 मेट्रिक टन खतसाठा
Published on
Updated on

रत्नागिरी : खरीप हंगाम 2026 ची तयारी कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. भात पिकांच्या पेरणीवेळी मोठ्या प्रमाणात खतांची मागणी असते. काहीवेळा स्टॉकही संपतो.त्यामुळे टंचाई परिस्थिती उद्भवू नये म्हणून जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात 650 मेट्रिक टन खतांचा साठा करून गोदामात ठेवण्यात येणार आहे.

सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे रासायनिक खत तयार करण्यासाठी लागणारा कच्च्ाा माल येत नसल्याने खतांच्या पुरवठ्यारव परिणाम होऊ लागला आहे. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी 28 हजार 625 मेट्रिक टन खताची मागणी केली होती. मात्र त्यापैकी 12 हजार 551 टन खतासाठी मंजुरी दिली आहे. दरम्यान, 650 मेट्रिक टन खताचा साठा गोदामात राखीव ठेवण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुख्य पीक भात व नाचणी पिक घेतली जाते. जिल्ह्यातील नऊ तालुक्यात भाताची पेरणी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना युरिया खताची कमतरता भासू नये तसेच अडचणीच्या काळात खत असावे म्हणून जिल्ह्यातील विविध तालुक्यात खताचा साठा ठेवण्यात येणार आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात खताची कमतरता भासू नये म्हणून आतापासूनच खताचा साठा करून ठेवण्यात येणार आहे. 2600 मट्रिक टन इतका खत येणार असून त्यातील 40 टक्के खतांचा साठा करण्यात येईल. उर्वरित दुकानदारांना वाटप होणार आहे.
- अभिजित गडदे, जिल्हा विकास कृषी अधिकारी, रत्नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news