Ratnagiri Accident : रिक्षाची कंटेनरला धडक; ४ महिलांसह ५ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटातील दुर्घटना
Ratnagiri Accident News
रिक्षाची कंटेनरला धडक; ४ महिलांसह ५ जखमी
Published on
Updated on

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात उभ्या असलेल्या कंटेनरला रिक्षाची मागून जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालक व चार महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. यामध्‍ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजता घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्‍या रिक्षाचालकाचे अविनाश चंद्रकांत शिंदे ( २८, रा. कणगवली शिंदेवाडी, ता. लांजा) असे नाव आहे.

अविनाश शिंदे हा आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८ बीसी ३२५६) घेऊन राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथे महिला प्रवाशांना घेण्यासाठी गेला होता. जाताना तो साटवली मार्गे गेला होता. परतीच्या प्रवासात चार महिला प्रवाशांसह तो ओणी मार्गे लांजाच्या दिशेने येत होता. रिक्षा वाकेड घाटात आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला (एमएच ४६ सीयू ०५७८) रिक्षाने मागून जोरदार धडक दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news