Ratnagiri Accident : एसटी बस रुग्णवाहिकेची जोरदार धडक

आरोग्य मंदिर परिसरात दोन तास वाहतूक कोंडी
Ratnagiri Accident News
एसटी बस रुग्णवाहिकेची जोरदार धडक
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर परिसरात शनिवारी सायंकाळी ४.३० वा. एक भीषण अपघाताची घटना घडली. एका एसटी बसने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर या मुख्य मार्गावरील वाहतूक व्यवस्था तब्बल दोन तास पूर्णपणे विस्कळीत झाली होती. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

शनिवारी सायंकाळ एक रुग्णवाहिका शिवाजीनगरहून आरोग्य मंदिर मार्गे माजगाव रोडच्या दिशेने जात होती. याच वेळी रत्नागिरी शहरातून साळवी स्टॉपच्या दिशेने जाणारी बोरीवली-रत्नागिरी ही एसटी बस तिथे आली. आरोग्य मंदिर चौकात एसटी बसने या रुग्णवाहिकेला अत्यंत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रुग्णवाहिकेचे मागील चाक निकामी होऊन फुटले, तर एसटी बसच्या समोरील भागाची काच फुटून थेट रस्त्यावर पडली. अपघात झाला तेव्हा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी आणि पादचाऱ्यांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले, तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातानंतर आरोग्य मंदिर चौक आणि मारुती मंदिर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. हा शहरातील अत्यंत गजबजलेला मार्ग असल्याने काही वेळातच येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्त्यावरील गर्दी हटवण्याचे काम सुरू केले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, तोपर्यंत ऐन सायंकाळी वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news