भरणे येथे उभ्या ट्रकला कारची धडक; 6 जण जखमी

Ratnagiri Accident | या अपघाताची पुढील तपासणी पोलिसांकडून सुरू आहे
भरणे येथे उभ्या ट्रकला कारची धडक; 6 जण जखमी
Published on
Updated on

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक देत कारचा अपघात झाल्याची घटना आज (दि. १ मे २०२६) पहाटे ३.१० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील सहा जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या भांडुप येथून मालवणच्या दिशेने जात असलेल्या वेगनार कारने भरणे येथील एसएमएस हॉस्पिटलसमोर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने कारमधील प्रवासी जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली तैनात असलेल्या जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान, नाणिज धाम यांच्या २४ तास अपघात मदतीसाठी सज्ज असलेल्या विनामूल्य रुग्णवाहिकेने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ सुजित शिंदे व शुभम यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले.

जखमींमध्ये जयेश राज शर्मा (२७, नवी मुंबई), अशा श्रीनिवास नायडू (८०), सुरेखा संतोष परब (४८), तीर्थ जितेंद्र ठाकूर (१८), प्रिय श्रीनिवास नायडू (१ वर्ष) व योगिता सतीश नायडू (३८, सर्व रा. भांडुप, मुंबई) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने यश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तत्परता दाखवत मदतकार्य केले. या अपघाताची पुढील तपासणी पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news