Ratnagiri Accident | माभळे येथे दरीत कोसळली रिक्षा, चालक - प्रवाशांनी वेळीच उडी मारल्याने वाचला जीव

रस्त्‍याचे काम सुरु असल्याने खोदकाम, पहिल्याच पावसात माती रस्त्यावर वाहून आल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय, घसरडा
Ratnagiri Accident
Ratnagiri Accident
Published on
Updated on

देवरुख : संगमेश्वर उजगाव मार्गावरील माभळे येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षा घसरून दरीत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने चालक आणि रिक्षातील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळीच उडी मारल्याने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्वर-उजगाव मार्गावरील माभळे ते सडा या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम जिल्हा परिषद सदस्या सौ. माधवी गीते यांच्या पाठपुराव्याने व पालकमंत्री मा. उदय सामंत यांच्या सहकार्याने मंजूर झाले आहे. काम सुरू करण्यापूर्वी ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करून ठेवले होते. पहिल्याच पावसात ही माती रस्त्यावर वाहून आल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय व घसरडा बनला आहे.

ग्रामस्थांनी याबाबत ठेकेदाराला वारंवार सूचना दिल्यानंतर गटार काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, योग्य सुरक्षितता आणि नियोजनाचा अभाव असल्याने रस्ता अधिकच धोकादायक बनल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास उजगाव येथील कानसरे हे रिक्षाचालक प्रवाशांसह घरी जात असताना रिक्षा अचानक घसरली आणि थेट दरीत कोसळली. चालक व प्रवाशांनी वेळीच उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले.

दरम्यान, पहिल्याच पावसात रस्त्यावरील माती वाहून गेल्याने कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारंवार सूचना देऊनही ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news