रत्नागिरी : चिपळुणात आढळला पाहुणा थिक बिल्ड ग्रीन पिजन

Green pigeon: अनेक वर्षांत प्रथमच पक्ष्याची झाली अधिकृत नोंद; पक्षीमित्रांसाठी ठरली पर्वणी
Chipalun wildlife
थिक बिल्ड ग्रीन पिजनpudhari photo
Published on
Updated on

चिपळूण शहर : चिपळुणच्या निसर्गसंपन्नतेवर शिक्कामोर्तब करणारी विशेष बाब नुकतीच निदर्शनास आली आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी ‘थिक बिल्ड् ग्रीन पिजन’ या दुर्मीळ पक्ष्याचे नुकतेच दर्शन झाले आहे. गेले काही दिवस हा अतिशय़ सुंदर सप्तरंगी पक्षी शहराच्या मध्यवर्ती वर्दळीच्या नागरी वस्तीत निदर्शनास येत असून चिपळुणातील संपन्न असलेल्या निसर्गाने लक्ष वेधून घेतले आहे. थिक बिल्ड् ग्रीन पिजन अर्थातच कबुतर प्रजातीमधील हा अत्यंत सुंदर पक्षी चिपळुणात आढळल्याने पक्षी निरीक्षक-अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

थिक बिल्ड् ग्रीन पिजन या पक्ष्याचा मूळ अधिवास हा आसाम, मणिपूर, नागालँड अर्थात सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळख असलेल्या राज्यांपासून ते थेट बॉर्नियो, सुमात्रा अशा प्रदेशात आढळतो. त्या ठिकाणच्या पोषक वातावरणामुळे त्यांच्या समुहाचा अधिवास त्या प्रदेशातून आहे. हिमाचलसारख्या थंड प्रदेशात वावरणारा हा पक्षी गेल्या काही दिवसांपासून अचानकपणेे चिपळुणातील शहराच्या मध्यवर्ती भर नागरी वर्दळीच्या वस्तीत आढळून आल्याने पक्षी निरीक्षकांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला आहे. कबुतर प्रजातीमधील हा अत्यंत देखणा, सप्तरंगी पक्षी या खास ठिकाणच्या भागात असलेल्या झाडांवरील फळे खाताना ओंकार बापट यांच्या प्रथम निदर्शनास आला. कुतूहल म्हणून त्यांनी पक्षीमित्रांशी संपर्क करून माहिती दिली. तातडीने पक्षीमित्रांनी देखील संबंधित ठिकाणी जाऊन छायाचित्रण केले आणि हा पक्षी अनपेक्षितपणे चिपळुणात स्थलांतरित झाल्याचा सुखद आश्चर्याचा धक्का बसला.

ग्रीन पिजन अर्थातच हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा राजपक्षी म्हणून ओळखला जातो. याच प्रजातीमध्ये हा पक्षी मोडत आहे. मात्र, त्याचा अधिवास हा केवळ हिमाचल प्रदेश ते त्या नजिकच्या सुमात्रा, बॉर्नियो आदी थंड हवेच्या भागात वास्तव्यास असतो. या पक्ष्याचे स्थलांतर कुठे, कधी व कसे होते, याबाबत पक्षी निरीक्षकांकडून अभ्यास सुरू असला तरी मात्र चिपळुणात हा पक्षी प्रथमच ऑन रेकॉर्ड स्पॉट झाला आहे. अर्थातच गेल्या अनेक वर्षांच्या पक्षी निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार हा पक्षी या वातावरणात स्थलांतरित कसा होऊन आला? मूळ अधिवास असलेल्या पोषक वातावरणातून चिपळुणात नेमका कसा आणि का आला? या बाबत अनपेक्षित आश्चर्य आहे. मात्र, त्या बरोबर चिपळूणच्या निसर्गसंपन्नतेचा आणि समतोल असलेल्या वातावरणाचा अभिमानही वाटत आहे. दुर्मीळ असा हा पक्षी सध्या गेले काही दिवस वड, उंबर, पिंपळ या झाडांची फळे खाऊन वास्तव्य करताना दिसून येत आहे.

या पक्ष्यासोबत त्याचा जोडीदार आढळून येत आहे. हे दोन्ही पक्षी ग्रीन पिजन अर्थात राजपक्षी हरियाल यांच्या थव्यातून वावरताना दिसून येत आहे. त्याला आवश्यक असणारे पोषक वातावरण येथे नसताना देखील हा पक्षी अचानक व अनपेक्षितपणे या ठिकाणी कसा स्थलांतरित झाला, याबाबत पक्षी अभ्यासक-निरीक्षक बंटी गुढेकर यांनी सांगितले की, मध्यंतरात या पक्ष्याचा मूळ अधिवास असलेल्या ठिकाणी झालेले नैसर्गिक व वातावरणातील बदल त्याचप्रमाणे वादळी वारे यामुळे हा पक्षी भरकटून दिशा चुकून आला असावा. गेल्या काही वर्षांचा पक्षी विषयात स्थलांतर, अधिवास एकूणच जीवनमान याचा अभ्यास करता चिपळुणात हा पक्षी आल्याची कुठेही नोंद आढळून येत नाही. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात हा पक्षी चिपळुणात ऑन रेकॉर्ड स्पॉट झाला आहे. आता या पक्ष्याच्या संपूर्ण हालचालींवर लक्ष केंद्रीत करून अभ्यास होणे गरजेचे आहे. कदाचित त्याच्या मूळ अधिवासात झालेल्या नैसर्गिक व वातावरणातील बदलामुळे, वादळी वार्‍यामुळे भरकटून व दिशा चुकून आला असेल तर तो परत त्याच्या मूळ अधिवासात कसा व केव्हा जाईल यासाठी आता पक्षी निरीक्षक व संबंधित वन विभागाकडून निरीक्षण नोंदविणे गरजेचे आहे. मात्र, चिपळुणातच या पक्ष्याच्या अनपेक्षित स्थलांतराची नोंद प्रथमच झाली आहेे.

अन्यथा हा पक्षी मूळ अधिवासात जाण्यासाठी प्रयत्न करेल

सध्या हा पक्षी गेले काही दिवस हरियाल पक्ष्यांच्या थव्यात वावरत आहे. जर सोबत असलेला पक्षी ही त्याची सहचारिणी अर्थात मादी असेल तर हा पक्षी येथील अधिवास वातावरणाशी जुळवून घेऊ शकतो. अन्यथा हा पक्षी मूळ अधिवासात जाण्यासाठी धडपड करील. काही पक्ष्यांमध्ये कोकिळकेसारखा आफ्रिकेतील स्थलांतरित पक्षी तसेच परदेशातून येणारे फ्लेमिंगोसारखे पक्षी त्यांच्या मूळ अधिवासातील वातावरणाला सरावले असताना देखील त्यांच्या मागील काही पिढ्या स्थलांतरित होत आता त्या-त्या ठिकाणच्या वातावरणाशी जुळवून घेत अधिवासीत झाल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news