

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरात रेशन दुकानांसाठी ई-केवायसी करणे आता महत्वाचे झाले आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. त्यांनी लवकर करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात 4 लाख 94 हजार 666 जणांच्या ई-केवायसीला मान्यता दिली आहे तर 20 हजार 947 जणांची केवायसी रिजेक्ट केली आहे तर 3 लाख 50 हजार 795 जणांच्या ई-केवायसीला मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. अद्याप 2 लाख 85 हजार 795 रेशनकार्ड धारकांनी ईकेवायसी पूर्ण केली नाही. 31 जुलैपर्यंत ई-केवायसी पूर्ण करा, अन्यथा धान्य बंद होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात रेशनकार्डला ई-केवायसी करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कित्येक वेळा ई-केवायसीची मुदतवाढ ही देण्यात आली आहे. अद्याप काही लोकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. जुलै अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात 2 लाख 85 हजार 795 रेशनकार्डची ई-केवायसी करायची आहे, असे पुरवठा विभागाने म्हटले आहे. त्यामुळे कार्डधारकांनो जुलै अखेरपर्यंत सार्वजनिक वितरण प्रणाली, विविध रेशनदुकानात किंवा घरातून ऑनलाई प्रणाली वापरून आपली ई-केवायसी पूर्ण करावी. अन्यथा रेशनदुकानातून मिळणारे धान्य मिळणार नाही. असा इशारा पुरवठा विभागाच्या वतीने संबंधित शिधापत्रिकाधारकांना देण्यात आला आहे.