

Rajapur Urban Bank Director Prakash Katkar passes away
राजापूर : पुढारी वृत्तसेवा
राजापूर शहरातील उद्योजक, हॅपी होम बोअरवेलचे मालक व राजापूर अर्बन बँकेचे संचालक प्रकाश कातकर यांचे सोमवार दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेसहा वाजता कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजापूर शहरावर शोककळा पसरली आहे.
राजापूर तालुक्यात कुणबी समाजाचे आधारस्तंभ म्हणुन त्यांची ओळख होती. विविध संघटनांच्या माध्यमातुन ते कायम समाजसेवेत अग्रेसर होते. शनिवारी अचानक त्यांची तब्बेत बिघडल्याने त्याना प्रारंभी रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांची तब्बेत आणखिनच खालावल्याने त्याना कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोल्हापूर येथे उपचार सुरु असतानाच सोमवार दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने राजापूर तालुक्याचे अतोनात नुकसान झाले असुन राजापूरवर शोककळा पसरली आहे. दरम्यान आज सोमवारी दुपारनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.