Rural Hospital OPD QR Code | राजापूर ग्रामीण रुग्णालयात आता 'डिजिटल' ओपीडी! क्यूआर कोड स्कॅन करा आणि रांगेतून सुटका मिळवा

Rural Hospital OPD QR Code | राजापूर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू
QR code Scan
Rural Hospital OPD QR CodeFile Photo
Published on
Updated on

राजापूर : पुढारी वृत्तसेवा

आरोग्य विभागाने सर्व सरकारी रुग्णालयात ओपीडीचा नंबर लावण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून नंबर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची राजापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे.

QR code Scan
Smart Electricity Meter Issues | कल्पना न देता स्मार्ट मीटर लावले तर गाठ आमच्याशी! मालवणच्या ऊर्जा मित्र बैठकीत वीज कंपनीला सज्जड दम

या डिजिटल सुविधेमुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आता ओपीडीचा नंबर काढण्यासाठी सरकारी रुग्णालयात ताटकळत रांगेत थांबावे लागणार नाही. त्याचवेळी या डिजिटल सेवेमुळे रुग्ण वा त्यांच्या नातेवाईकांची वेळेची बचत होणार आहे. या सुविधेमुळे वृद्ध, दिव्यांग, लहान मुलांसह आजारी रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही वर्षांत शासनाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर दिला आहे. जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासणी सुविधा आणि औषधसाठा यामध्ये वाढ केली आहे.

त्यामुळे अनेक रुग्ण आता मोफत किंवा अल्पदरात उपलब्ध असलेल्या शासकीय उपचारांचा लाभघेण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र रुग्णसंख्या वाढल्याने सरकारी रुग्णालयांत ओपीडीसाठी गर्दी होते. त्यातून, ओपीडीसाठी नंबर लावण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना रांगेत उभे राहावे लागते.

त्यामध्ये विशेषतः वृद्ध, दिव्यांग आणि लहान मुलांसह आलेल्या पालकांना विशेषतः त्रास सहन करावा लागतो. काहीवेळा केवळ नंबर लावण्यासाठीच तासनतास वाया जात असल्याने नागरिकांत नाराजीही व्यक्त होते. या साऱ्याचा विचार करून आरोग्य विभागाने ओपीडीसाठी नंबर लावण्यासाठी डिजिटल सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची शासकीय रुग्णालयांमध्ये अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

QR code Scan
SSC Exam | कणकवलीत लेकीच्या जिद्दीने पाणावले साऱ्यांचे डोळे; आईच्या निधनाचे डोंगरएवढे दुःख पचवून सई पोहोचली परीक्षा केंद्रावर

क्यूआरकोड स्कॅनद्वारे असा लावा नंबर

रुग्णालयाच्या प्रवेशद्वार किंवा ओपीडी विभागाजवळ लावलेला क्यूआर कोड मोबाईलमधील कॅमेऱ्याने किंवा स्कॅनर अॅपने स्कॅन करा. त्यानंतर उघडणाऱ्या लिंकवर रुग्णाचे नाव, वय, मोबाईल क्रमांक आणि आवश्यक विभागाची माहिती भरावी,

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला ओपीडी क्रमांक मोबाईलवर मिळेल. ओपीडी नंबरवर अंदाजे वेळ संबंधित कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येईल. त्या वेळेला रुग्णालयात हजर राहिल्यास रांगेत तासन्तास थांबण्याची गरज राहणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news