Rajapur Illegal Tree Cutting: पाचलोबा मंदिर परिसरात 95 झाडांची बेकायदा तोड

शासकीय जमिनीवरील लाखोंच्या लाकडाची चोरी; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
Tree Cutting
Tree CuttingPudhari
Published on
Updated on

राजापूर : तालुक्यातील पाचल येथील ऐतिहासिक पाचलोबा मंदिर परिसरातून लाखो रुपयांच्या झाडांची बेकायदा तोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासकीय जमिनीवरील मनाई आणि बिगरमनाई जातीची एकूण 95 झाडे कोणत्याही परवानगीशिवाय तोडून सुमारे 2 लाख 86 हजार 530 रुपयांची चोरी करण्यात आली आहे.

Tree Cutting
MSEDCL Electricity: थकीत वीजबिलांवर महावितरणची कारवाई; 4 महिन्यांत 30 हजार कनेक्शन खंडित

पाचल सजाचे ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मण शामराव नरके यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पाचल गावातील पाचलोबा मंदिर परिसर ज्याला पाचलोबाची राई म्हणून ओळखले जाते. सर्व्हे नं. 805 ही शासकीय जमीन आहे. या जमिनीवर 25 डिसेंबर 2025 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली.अज्ञात चोरट्यांनी या परिसरातून मनाई जातीची 25 झाडे, बिगरमनाई जातीची 70 झाडे तोडून नेली आहेत. अशा एकूण 95 झाडांची कत्तल करून 2 लाख 86 हजार 530 रुपयांच्या लाकडाची चोरी करण्यात आली आहे.

Tree Cutting
Mental Health Guidelines: विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी शाळांत समुपदेशक अनिवार्य

या गंभीर प्रकाराची दखल घेत तलाठी लक्ष्मण नरके यांनी 28 फेब्रुवारी रोजी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता 2023 च्या कलम 303 (2) प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शासकीय जमिनीवरील व देवराईसारख्या पवित्र मानल्या जाणाऱ्या परिसरातील या वृक्षतोडीमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलिस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चोरट्यांचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news