

रत्नागिरी : उन्हाळी हंगामात कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल ते जून 2025 या कालावधीत या गाड्या धावणार आहेत.
याबाबत कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार गाडी क्र. 01151 मुंबई सीएसएमटी-करमळी विशेष (साप्ताहिक) ही 10 एप्रिल 2025 ते 05 जून 2025 दरम्यान दर गुरुवारी मुंबई सीएसएमटीहून रात्री 12 वा.20 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी दीड वाजता गोव्यात करमळीला पोहोचेल. गाडी क्रमांक 01152 कार्मळी - मुंबई सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) 10 एप्रिल 2025 ते 5 जून 2025 दरम्यान करमळीहून दर गुरुवारी दुपारी 2 वा. 15 मिनिटांनी सुटेल आणि दुसर्या दिवशी पहाटे 3.45 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. ही दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम या स्थानकांवर थांबणार आहे.
डब्यांची रचना : एकूण 22 डबे : टू टायर एसी - 1, थ्री टायर एसी - 5, स्लीपर - 10, जनरल - 4, एसएलआर - 2.
दुसरी विशेष गाडी क्र. 01129 लोकमान्य टिळक (टर्मिनस) - करमळी विशेष (साप्ताहिक) दर गुरुवारी 10 एप्रिल 2025 ते 5 जून 2025 या कालावधीत लो. टिळक टर्मिनसहून रात्री 10.15 वाजता सुटून दुसर्या दिवशी 12 वाजता ती गोव्यात करमळीला पोहोचेल.
गाडी क्र.01130 करमळी - लोकमान्य टिळक टर्मिनस) विशेष (साप्ताहिक) दर शुक्रवारी 11 एप्रिल 2025 ते 6 जून 2025 दरम्यान करमळीहून दुपारी अडीच वाजता सुटून दुसर्या दिवशी पहाटे 4 वाजून 5 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम थांबे घेणार आहे.
डब्यांची रचना : एकूण 19 एलएचबी डबे: फर्स्ट एसी - 1, टू टायर एसी - 2, थ्री टायर एसी - 6, स्लीपर - 8, जनरेटर कार - 02.
तिसरी साप्ताहिक गाडी क्र. 01063 लो. टिळक टर्मिनस- तिरुवनंतपुरम विशेष 3 एप्रिल 2025 ते 29 मे 2025 दरम्यान दर गुरुवारी लो. टिळक टर्मिनसहून सायंकाळी 4 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 10 वा. 45 मिनिटांनी तिरुवनंतपूरम उत्तरला पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात ही विशेष गाडी (01064) तिरुवनंतपूरम उत्तर - लो. टिळक टर्मिनस येथून 5 एप्रिल ते 31 मे 2025 या कालावधीत दर शनिवारी तिरुवनंतपूरम उत्तरहून सायंकाळी 4 वा. 20 मिनिटांनी सुटून तिसर्या दिवशी रात्री 12 वाजून 25 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, कार्मळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बायंदूर (एच), कुंदापुरा, उडुपी, सुरतकल, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कण्णूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जंक्शन, त्रिसूर, एर्नाकुलम टाऊन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिकरा, कायंकुलम आणि कोल्लम जंक्शन हे थांबे घेणार आहे.
डब्यांची रचना : एकूण 22 एलएचबी डबे: टू टायर एसी - 1, थ्री टायर एसी - 6, स्लीपर - 9, जनरल - 4, जनरेटर कार - 1, एसएलआर - 1.