

रत्नागिरी : महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गरिब, मध्यमवर्गीय आपला इलाज आता सिव्हील हॉस्पिटलमध्ये करून लागले आहेत. खासगी रुगणालयामध्ये प्रसूती करण्यासाठी लाखोरूपये खर्च येत असल्यामुळे गरोदर माताही आता सिव्हील हॉस्पीटलला पसंती देत आहेत. मागील वर्षात 13 हजार 936 इतक्या प्रसूती झाल्या असून त्यापैकी 8 हजार 950 इतक्या या नैसर्गिक डिलिव्हरी झाली 4 हजार 986 इतक्या सिझेरियन प्रसूती झाल्या असल्याचे सांगण्यात आले.
महिला गर्भवती झाल्यानंतर प्रसतीसाठी खासगी किंवा सिव्हील रुग्णालयामध्ये दाखल होत असतात. मात्र खासगी हॉस्पीटलमध्ये प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेत असतात. त्यामुळे गरिबांना ते परवडत नाही. सर्वसामान्य, कष्टकरी व मध्यवर्गीय लोक विविध ऑपरेशनसाठी, गरोदर माता आता सिव्हील हॉस्पीटलमध्ये वळू लागल्या आहेत. एकीकडे इतर जिल्ह्यात खासगीसह सिव्हील हॉस्पीटलमध्ये सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण वाढत असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात मात्र परिस्थिती वेगळी असल्याची दिसून आली. येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये अत्याधुनिक सुविधा असल्यामुळे गरोदर मातांची नैसर्गिक प्रसूती वाढली आहे तर सिझेरियनचे प्रमाण कमीच असल्याचे मागील पाच वर्षाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.