Pratap Sarnaik : एनसीएमसी कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा; जिल्ह्यात ३० हजारहून अधिक कार्ड नोंदणी
NCMC Smart Card
Pratap Sarnaik Pudhari
Published on
Updated on

रत्‍नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सवलतधारक प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात 3 हजार हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कार्डची जादा दराने विक्री केल्‍यास परवाना रद्द करू असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. राज्‍यात लाखोंनी स्‍मार्ट कार्ड काढली, तर रत्‍नागिरी जिल्‍ह्यात 30 हजारहून अधिक स्‍मार्ट कार्डची नोंदणी झाली आहे.

नवीन एनसीएमसी कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार, काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी NCMC कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‌‘अमृत‌’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news